
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी.६ लाख ४ हजार ९०० – रुपयांचा मुद्देमाल जप्त. ०२ गुन्हे दाखल
लातूर :- { दिपक पाटील } दिनांक ०६ /०८/२०२१ रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अवैध धंद्यावर कार्यवाही करीत असताना विशेष पथकाला माहिती मिळाली की , गातेगाव ते चिंचोली बल्लाळनाथ रोड वरून ओमीनी कार अवैध दारू चे पेट्या घेऊन जाणार आहे ही माहिती मिळताच गातेगाव ते चिंचोली बल्लाळनाथ रोडवर महावितरण च्या ३३ के.व्ही. गेट जवळ सापळा लावला असता थोड्याच वेळात रोडवर एक ओमीनी कार क्रमांक एम.एच २४ व्ही ६७४८ येताना , त्यास थांबवून ओमीनी कार चे पाठीमागील दार उघडून पाहिले असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूच्या पेट्या दिसून आल्या. त्यास दारू विक्री परवाना बाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितल्याने आरोपी नामे
१} बालाजी प्रभाकर डुडलेवार , वय ३६ वर्ष, राहणार-शर्मा नगर, औराद शहाजनी ,ह.मू .महादेव नगर १२ नंबर पाटी, लातूर असे सांगितले
त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे गातेगाव येथे कलम ६५ {अ }{ ई } महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्याकडून अवैध विक्री/व्यवसाय साठी घेऊन जात असलेला दारूचा ८३,४०० रूपयांचा मुद्देमाल व ओमीनी कार एम. एच. २४ व्ही ६७४८ ज्याची अंदाजित किंमत १,८०००० हजार असा एकूण /-२,६३४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास गातेगाव पोलीस स्टेशन येथील पो.हे. शिरीष पाटील करत आहे.
व लातूर ला परतत असताना विशेष पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून पिव्हीआर चौकातून ते भांबरी चौकाकडे एक असेंट कार अवैध दारू घेऊन जाणार असल्याचे सांगीतले असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन चे आर्वी बिटजमादार पो.हे. सोन्याबापु देशमुख व पो.ना. युवराज जाधव हे पेट्रोलिंग करत असताना, त्यांना ही माहीती देवून सहकार्य करण्यास सांगीतले ,काही वेळातच एक असेंट कार येताना समोरून दिसली , कार ला थांबवून चौकशी केली असता अवैध विक्री/व्यवसाय साठी दारूचा पेट्या घेऊन जात होते त्याच्याकडून मॅक्डोल व्हिस्की दारूच्या ८ पेट्या किंमत ६१, ४४० रुपये व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली जुनी असेंट कार क्रमांक एम.एच.२४ , सी.५०९९ असा एकूण ३ लाख ४१ हजार ४४० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसम नामे
१} उमेश सूर्यकांत कांबळे, वय २४ वर्ष, राहणार- टाकळी ब.ता. जि. लातूर २} विकास प्रकाश गायकवाड याचे विरुद्ध पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे कलम. ६५ {अ }{ ई } ८,३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पो.हे. सोन्याबापू देशमुख व पो.ना.युवराज जाधव करत आहे. सदरील कार्यवाहीत विशेष पथकातील पो.हे.चन्द्रकांत डांगे, पो.ना.रमेश चौधरी, पो.ना.सुरवसे, पो.ना.जायभाये, पो.काॅ.खंदाडे यांनी सहभाग घेतला.
