
लातूर : { दिपक पाटील } मिञाशी भांडण करून त्याला मारहाण करून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना गुलटेकडी, जुना औसा रोड येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, गोकुळ बंडूलाल मंञी (वय ३५ ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, की संशयित आरोपी प्रसाद विठ्ठल शिंदे वय १८ व कौस्तुभ संजय कांबळे दोघेही राहणार जुना औसा रोड, यशवंत नगर लातूर व मयताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने , आणखीन काही आरोपीचा सहभाग आहे का ? याचा शोध पण पोलीस घेत आहेत .या तिघामध्ये मागील भांडणाची कुरापतीच्या कारणावरून भांडण झाले व त्याचाच राग अनावर होऊन आरोपींनी मयत गोकुळ मंञी याच्यावर जवळील तीक्ष्ण हत्याराने अनेक वार केले , झालेले वार वर्मी लागल्याने ,व गंभीर दुखापत झाल्याने त्याला सिव्हिल हाॅस्पिटल येथे नेले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले . त्यामुळे मयताची पत्नी अकांशा गोकूळ मंञी रहाणार दादोजी कोंडदेव नगर ,लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं.३१५/२०२१ कलम ३०२ ,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासातच दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले असल्याने पोलीसांची कार्य तत्परता ही लक्षात येते, मयताच्या पश्चात पत्नी व लहान दोन मुली असल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे, पुढील तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील पुजारी करत आहेत.
