Spread the love

उमरगा : ( प्रतिनिधी) काठमांडू ( नेपाळ ) येथे होणाऱ्या साऊथ एशियन लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या लाठी संघाची निवड झाली आहे . २६ ते ३० मे या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत . या स्पर्धेसाठी १४ वर्षा खलील गटात स्वप्नाली निंगशेट्टी , १४ वर्षा खलील गट अयान शेख, व ८ वर्षाखालील गटात आदित्य गायकवाड निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी उस्मानाबादचा संघ तयारी
करीत असुन २३ मे रोजी प्रशिक्षक महमदरफी शेख यांच्या नेतृत्वखाली हा संघ रवाना होणार आहे . या स्पर्धेसाठी लाठी असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. युसूफ मुल्ला, सचिव सुरज मोहीते (मुंबई) यांनी लाठी टीम महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या व उस्मानाबाद जिल्हा क्रीड़ा अधिकारी श्रीमती मीरा रायबन, क्रीड़ा अधिकारी श्री.लटके, श्री.जावेद, मनोज पतंगे, महमदरफी शेख यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!