
लातूर,दि.13( प्रतिनिधी ):- राज्यात वेळोवेळी उदभवनाऱ्या नैसर्गिक व इतर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात आपत्कालीन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.येथील स्वामी रामनंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना कोविड योध्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, प्र.कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की,राज्यात नैसर्गिक आपत्ती अधूमधून उदभवत आहे.या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात आपत्कानील व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करण्यात येणार असल्याचे सांगून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठांनी राज्यात सर्व प्रथम आपत्कालीन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करुन बरेचसे सर्व्हेक्षण केले आहे. त्यामुळे मी विद्यापीठाचे कौतुक करतो. या विद्यापीठात कोरोना काळात कोरोना स्वॅब तपासणी देशातील पहिली लॅब चालू केली आहे.अशा सामाजिक कार्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी भारत पवार यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार केला तसेच राजर्षी शाहू महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय म्हणून प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांचा तर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. कल्याण सावंत यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी आपल्या प्रास्तावीकात विद्यापीठाची सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमास स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राचार्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ,सिनेट सदस्य व विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन संचालक उपकेंद्र डॉ. राजेश शिंदे यांनी तर आभार डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
