
लातूर : { दिपक पाटील } शहरातील मंगल कार्यालय,लाॅन्स, वर्दळीचे ठिकाण, दवाखाने, रस्त्यावर मोबाईलवरून बोलत चालत जाणारे ,गल्लीबोळातून जाणारे पादचारी यांचेकडून मोबाईल फोन जबरदस्तीनं पळणार्या चोरणाऱ्या चोरांचा शोध घेण्याकरिता एमआयडीसी पोलीस ठाण्यातील डीबी पथक माहिती घेत असताना , व राञीच्या वेळेस हद्दीत गस्त घालीत असताना , त्यांना टिना चौक येथे एक अटोरिक्षा संशयित रित्या फिरताना दिसला, त्याला थांबवून चौकशी करताना आतमधील लोकांनी त्यांची नावे नामे १} नागेश बब्रूवान थोरात वय १९ वर्ष रा. भांबरी चौक लातूर २ } अक्षय प्रभाकर कणसे वय २४ वर्ष रा. वाल्मीकी नगर लातूर ३}राजकुमार बाबुराव चिंताले वय १९ वर्ष रा.माऊली नगर पाखरसांगवी लातूर असे सांगीतले , त्यांच्याकडून अंगझडती घेतली असता त्यांचेकडे चार मोबाईल आढळून आले ,त्या चार मोबाईल पैकी एका मोबाईल ची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती, मोबाईल चोरीत तिघा चा हातखंडा असू शकतो ,असल्या कारणावरून पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याना पकडून विश्वासात घेऊन ठाण्यात अटो सह आणून विचारपूस केली असता, गु.र.नं.५३४/२०२१ कलम ३७९ भादवि नुसार शोध नुसार त्यांच्याकडून मोबाईल जप्त करून आणखीन अधिक विचारपूस करत असताना त्यांचा चौथा साथीदार सचिन बाळासाहेब पवार वय ३० वर्ष रा.रायवाडी ता.जी. लातूर त्यालाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपनीचे तब्बल २३ मोबाईल व पहिले ४ असे एकूण २७ मोबाईल किंमत २,३८००० रूपयांचा व एक अटो एम एच २४ एटी १६८६ किंमत ५०,००० हजार असा जवळपास २ लाख,८८००० रूपयांचा मुद्देमाल जप्त असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे , यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर,पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड पो.हे. भिमराव बेल्लाळे, पो.ना.युवराज गिरी, पो.ना.प्रशांत ओगले, पो.ना. अर्जुन राजपूत, पो.काॅ.मदार बोपले ,सिद्धेश्वर मदने यांनी सहभाग घेतला व पुढील तपास स.पो.उप.नी सर्जेराव जगताप करत आहेत.
