
लातूर :- (दिपक पाटील) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 22 हजार 500 बोनस जाहीर केला त्यामुळे मुंबई पालिकेचे तिजोरीवर 225 कोटीहून जास्त आर्थिक भार पडणार आहे तसेच पालिकेच्या शिक्षकांनाही 22 हजार 500 बोनस मिळणार आहे पण त्यांना दिवस-रात्र कोरोनाच्या काळात काम चांगले केलेले पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी त्यांना कसे दिसले नाहीत ? हा प्रश्न काही कर्मचारी चर्चा करताना दिसत आहेत पोलिसांनाही घर आहे पोलीस दिवस रात्र रस्त्यावर बंदोबस्तात आपल्या घराची तमा न बाळगता ऑन ड्युटी असतो,

कुठला सणवार ते घरच्या सोबत साजरे करत नाहीत, तरीही त्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस पासून वंचित ठेवले जाते हाच आहे का शिंदे सरकारचा न्याय ? दिवाळी सण जवळ येताच सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस चे वेध लागलेले असतात दसऱ्यापूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केले जाते, परंतु राज्यातील पोलीस डिपार्टमेंट बोनस पासून नेहमी वंचित राहते यावर्षी दिवाळी बोनस ची चर्चा सुरू होताच पोलिसांनी देखील त्यात उडी मारली आहे आर आर चव्हाण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे चव्हाण हे धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षक या पदावर आहेत त्यांनी पत्रात सांगितले आहे की शासनाच्या नियमानुसार पोलीस डिपार्टमेंट वगळून इतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा आहे त्याचप्रमाणे एका वर्षात 52 शनिवार येतात व इतर पोलीस डिपार्टमेंट सोडून शासकीय सुट्ट्या 24 असतात मात्र पोलीस 52+24= 76 दिवस दहा ते पंधरा तास कर्तव्यावर असतो तसे पहिले गेले तर पोलिसांना त्या 76 दिवसाचा पगार द्यायला पाहिजे पण पोलिसांना संपूर्ण आयुष्य तडजोड करून राहावे लागत आहे,

तरी मुख्यमंत्री महोदयांनी फक्त एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्यात यावा अशी विनंती चव्हाण यांनी केली आहे पोलिसांनी बोनस कामकाजाच्या वेळा आणि सुट्ट्याबाबत बरेच वेळा आवाज दिला आहे पण गेल्या कित्येक वर्षापासून कुठलाही निर्णय होत नसल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत
