कळंब:- (राहुल हौसलमल) ईद-ए-मिलाद पैगंबर हजरत मोहम्मद (स) जयंती कळंब शहरात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पूर्ण देशभरात ईद ए • मिलाद ऊन नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. कळंब शहरातून यावेळी भव्य अश्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक ऐक्य व सद् भावनेचे प्रतीक असणारा ईद-ए-मिलाद साठी हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या.मुस्लिम बांधवांनीही शुभेच्छा देताना म्हटले की,तमन्ना आपकी सब पुरी हो जाए,हो आपका मुकद्दर इतना रोशन की, आपकी हर दुवा कबूल हो जाए ! आप और आपके परिवार को, ईद-ए-मिलाद ऊन नबी मुबारक….यावेळी कळंब शहरातून सकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरातील लहान मुले हातात झेंडे फडकत आनंद व्यक्त करीत होते. या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी कळंबचे पोलीस उपअधीक्षक एम.रमेश,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
