4 गुन्ह्यांतील लुटीची रक्कम, मोबाईलसह 7 आरोपी ताब्यात.

तुळजापूर ( दिपक पाटील) गोपाळपुर, ता. पंढरपुर येथील- निलेश दिलीप कुचेकर, वय 36 वर्षे व पंढरपुर येथील- श्रावण शाम वाघमारे, वय 21 वर्षे व उस्मानाबाद येथील- गणेश आनंदराव पाटील, वय 34 वर्षे हे तिघेजण दि. 09.10.2022 रोजी 08.00 ते 10.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील जुन्या बस स्थानक येथे होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी इसमांनी कुचेकर व वाघमारे या दोघांच्या खिशातील अनुक्रमे 1,700 ₹, 1,500 रूपये रोख रक्कम जबरीने लुटली होती. तर गणेश पाटील यांच्या बँगमधील 1,600 रूपये रोख रक्कम पाटील यांच्या नकळत अनोळखी इसमांनी चोरुन नेली होती. तसेच सोलापूर येथील- अंबादास गणेश श्रीपते व राकेश गणेश नामन हे दोघे याच दिवशी 07.15 वाजण्याच्या सुमारास. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजापूर येथे असताना एका अनोळखी व्यक्तीने श्रीपते यांच्या खिशातील विवो मोबाईल फोन व त्या फोनच्या मागील कव्हरमध्ये असलेले 2,400 रोख आणि नामण यांच्या खिशातील रेडमी मोबाईल फोन असा एकुण 20,400 रूपयचा मुद्देमाल त्या दोघांना धमकावत जबरीने चोरुन नेला होता. यावरुन निलेश कुचेकर, श्रावण वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 369, 370/2022 तसेच गणेश पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 371/2022 व अंबादास श्रीपते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा क्र. 373/2022 असे एकुण 4 गुन्हे तुळजापूर पोलीस. ठाण्यात नोंदवले आहेत. दरम्यान नवरात्र उत्सव निमीत्ताने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात गस्तीस होते. यावेळी पथकाने फिर्यादींनी सांगीतलेल्या त्या इसमांच्या वर्णनाच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीवरुन सलगरा, ता. जि. लातूर येथील- 1) विठ्ठल ग्यानबा जाधव, वय 27 वर्षे 2) प्रकाश रमेश गायकवाड, वय 34 वर्षे 3) बाळासाहेब युवराज गायकवाड, वय 22 वर्षे 4) बालाजी युवराज गायकवाड, वय 19 वर्षे तसेच अंबरनाथ, जि. ठाणे येथील- 5) सुधीर नागनाथ जाधव, वय 45 वर्षे 6) संतोष शरणाप्पा जाधव, वय 38 वर्षे व 7) आकाश बालाजी राजुळ, वय 24 वर्षे, रा. सोलापूर

या सात लोकांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत तुळजापूर बस स्थानक व मंदीर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नमूद चोरीतील रोख रक्कम, मोबाईल फोन आढळल्याने पथकाने ते हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव त्यांना चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा चे पोलिस निरीक्षक श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. शैलेश पवार, मनोज निलंगेकर, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, विनोद जानराव, जावेद काझी, प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, कवडे, नितीन जाधवर, अजित कवडे, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, अमोल चव्हाण, बलदेव ठाकुर, रविंद्र आरसेवाड, भालचंद्र काकडे, शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.
