Spread the love

कळंब :- ( राहुल हौसलमल )कळंब शहरात दि.9/10/2022 रोजी ईद-ए-मिलादुन्नबी (मो.पैगंबर जयंती) मोठ्या उत्साहात पार पडली या निमित्ताने शहरातून नयनरम्य देखाव्यासह पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघालेल्या या मिरवणुकीत लहान मुले अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.. याच शुभ प्रसंगाचे औचित्य साधून दयावान प्रतिष्ठान कळंब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी लहान-थोरा साठी लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, डिकसळचे सरपंच अमजद मुल्ला,नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते शकील,अरुण चौधरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तारेख सलीम मिर्झा, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्मीकांत हुलजुते, आनंद वाघमारे,किशोर वाघमारे,गजानन चोंदे, दीपक पाटील, जावेद शेख, मिनाज शेख, वसीम शेख, सत्तार शेख यांच्या शुभहस्ते कार्यक्रमात लाडू वाटप करण्यात आले. दयावान प्रतिष्ठान कळंब आयोजित हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला,समीर मुल्ला, तानाजी चव्हाण,अलीम दारूवाले,सलीम बागवान, सिद्धार्थ सोनवणे,मोहसीन मुल्ला,आकाश पवार,समीर सय्यद,आरिफ पठाण, सलमान पठाण,फरमान सय्यद,अभय गायकवाड,मुन्ना जगदाळे यासह दयावान प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!