आ राणा जगजितसिंह पाटील
उस्मानाबाद ( राहुल हौसलमल ) महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यादिशेने त्यांनी प्रवास सुरू केला. स्वतंत्र काही काम करता यावे या अनुषंगाने त्यांनी शिलाई मशीन चालविण्याचे शिक्षण पूर्ण केले. लग्न झाल्यानंतर केवळ ‘चूल आणि मूल’ न सांभाळता टेलरिंगचा व्यवसायही करायचा असा विचार त्यांनी केला. मात्र व्यवसायासाठी भांडवल कसे उपलब्ध होणार ? हा प्रश्नच होता.याचवेळी सौ.अक्षता यांना ‘भाजपा आपल्या गावी’ या अभियानाच्या माध्यमातून #PMEGP योजनेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला. कार्यालयाच्या मदतीने कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना १,२५,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.तेर हे गाव १८ ते २० हजार लोकसंख्येचे सुधारित गाव असल्याने महिन्याला सरासरी २० ते २२ हजार रुपये उत्पन्न मिळेल असा त्यांचा एकूण अंदाज आहे. सदर व्यवसायात अधिकाधिक वाढ करून इतर माता भगिनींना देखील त्यात सहभागी करून घेण्याची त्यांची इच्छा आहे.आपल्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी, सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास आपण कायमच कटीबद्ध आहोत.
