Spread the love

शिरूर अनंतपाळ ( प्रतिनिधी) शिवनेरी महाविद्यालय येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी भाषा आणि वांग्मय मंडळाचे उद्घाटन शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका प्रा. डॉ. मंथा पद्मनाभिणी प्रकाशराव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लातूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ .उर्मिला धाराशिवे या उपस्थित होत्या तर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष अड सुतेज माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. सूर्यवंशी सर तिन्ही भाषेचे सर्व प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील इंग्रजी विभाग प्रमुख .प्रा किशोर कुरे प्रा .रोडगे जी .एस. मराठी विभाग प्रमुख . प्रा. डॉ अमोल इंगळे हिंदी विभाग प्रमुख. डॉ.डी बी जाधव प्रा. मारोती गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती. तिन्ही भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून भाषेचे महत्व विशद केले. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी एडवोकेट विश्वंभर रावजी माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .व हिंदी साहित्यातील संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा .डॉ.मंथा मॅडम यांनी भाषा व वांग्मय मंडळ हे विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी कसे उपयोगी ठरतात तसेच इंग्रजी भाषा ही जागतिकीकरणांमध्ये इंग्रजी शिकणे ही काळाची गरज असून इंग्रजी पासून घाबरून न पळता प्रत्येकाने इंग्रजी शिकणे व बोलणे यासाठी आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या काळात तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही .महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श समोर ठेऊन प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये कशी शक्य आहे असे सविस्तर मार्गदर्शन याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना केले .प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या डॉक्टर उर्मिला धाराशिवे यांनी बदल ही काळाची गरज असून टेक्नॉलॉजीचा वापर हा चांगल्या कामासाठी स्वतःच्या विकासासाठी करावा भाषेवर प्रभुत्व मिळवून आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट सुतेज माने यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा ही शिकून घेतली पाहिजे व येणाऱ्या काळात महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल चांगल्या कंपनीमार्फत घेण्यात येईल विद्यार्थ्यांनी त्या प्लेसमेंट सेलमध्ये आपली निवड होण्यासाठी इंग्रजी सारख्या विषयाचे ज्ञान वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना आश्वासित केले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी एन.बी यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी भाषेचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने असते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रशांत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाषा व वांग्मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. किशोर कुरे यांनी केले.तर पाहुण्यांचा परिचय मराठीचे विभाग प्रमुख प्रा. रोडगे गोरोबा यांनी केले .तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर अमोल इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्व स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!