उदगीर (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे,अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे मौजे डोंग्रज येथे,
आज दिनांक 11/10/2022 रोजी उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाला गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, मौजे डोंग्रज शिवारात इसम नामे दशरथ रामचंद्र कांबळे याने त्याचे मालकीचे ऊसाचे शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची झाडाची लागवड केली आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर श्री.डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनेच्या ठिकाणी मौजे डोंग्रज येथील इसम नामे दशरथ रामचंद्र कांबळे याचे ऊसाचे शेतामध्ये जाऊन छापा मारला. त्याचे उसाच्या शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची 44 झाडे लावलेली मिळून आली. सदर गांजाचे झाडांची घटनास्थळीच दोन शासकीय पंचांसमक्ष पंचनामा करून वजन केले असता त्याचे वजन 109 किलो व किंमत अंदाजे 10,01,619/- रु. इतकी असून सदरचा मुद्देमाल हा ताब्यात घेतला आहे. यातील आरोपी नामे दशरथ रामचंद्र कांबळे, वय 47 वर्ष, राहणार डोंग्रज तालुका चाकूर यास ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक क 646/2022, कलम 08, 20, 22 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे करीत आहेत. सदरची कार्यवाही वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी,उदगीर श्री.डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, तानाजी चेरले,पोलीस अमलदार रमेश कांबळे, राम बनसोडे , सखाराम भिसे, सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा पवार, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नामदेव चेरले, शिवदास बोईनवाड, गंगाधर साखरे, नजीर शेख यांनी केली आहे.
