
उस्मानाबाद -( जिल्हा प्रतिनिधी, श्रीकांत मटकीवाले )मौजे आरणी ता.लोहारा येथील बौध्द दलित समाज बांधवांच्या अंत्यविधीच्या स्मशानभूमी साठी जागा ठाम नसल्याने आरणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले,दि.१०/१०/२०२२ रोजी म्हणजे दोन दिवसा पुर्वी गावातील एक वृद्ध महिला मयत झाली असता तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मयताच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यविधी करण्यात आले,गावातील गट नं.७० मधिल सरकारी परंपोक नावाने ७/१२ उतारा वरती नोंद असलेल्या जागेत पिढी न पिढी दलित समाजातील मयत झालेल्या नागरिकास स्त्री असेल या पुरुषास त्यांच्या परिस्थिती नुसार त्या जागेत पुरणे अथवा जाळले जाते.परंतु या जागेचा ताबा अद्यापही न मिळाल्याने या जागेत कालचा मयत झालेल्या महिलेचा अंत्यविधी तेथील शेजारच्या लोकांनी करु दिला नाही,शेवटी दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला नदीकाठी तो अंत्यविधी करण्यात आला.याबाबत जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी फोन करुन माहिती देऊन भेटण्यासाठी ग्रामस्थ आले असता मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी व्यस्त असल्याने महसुल विभागातील तहसिलदार श्री पांडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली,सोबत लोहाराच्या नायब तहसिलदार मॅडम या देखिल उपस्थित होत्या,या संदर्भात ग्रामपंचायत येथुन याबाबत प्रस्ताव बिडीओ, तहसिलदार यांचेकडे गेला आहे.आम्हा दलित समाजाला स्मशान भुमीसाठी हि जागा त्वरित ७/१२ उतारा वरती नोंद घेऊन स्मशान भुमीला चारही बाजुंनी कंपाऊंड वॉल भिंत,आत जाण्यासाठी गेट,अंत्यविधी साठी पत्र्याचे शेड,निवारा शेड,पाणी या बाबी करुन देण्यात याव्या.अशा प्रकारची मागणी या वेळी करण्यात आली, महसूल तहसिलदार यांनी उपस्थित असलेल्या लोहारा नायब तहसिलदार मॅडम यांना त्वरित याकडे लक्ष देऊन स्मशान भुमीची ७/१२ उतारावरती नोंद घेऊन दलित वस्ती सुधार योजनेतुन बाकीचे नियोजन करून द्यावे अशी सुचना दिली.यावेळी भारतबाई मस्के, शकुंतला मस्के,द्वारका मस्के,कस्तुरा थोरे,द्रोपदी मोटे,विजया कांबळे,मिलन कांबळे, शिवाजी मस्के, गुणवंत मस्के, हनुमंत मस्के,मेसु थोरे,अतुल हावळे,गोरोबा मोठे,गौतम कांबळे,अन्य इतर तर सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,सचिन वाघमारे, आरपीआय (आठवले)चे विद्यानंद बनसोडे,राजभाऊ बनसोडे, आप्पा धावारे अन्य इतर उपस्थित होते.
