
कळंब ( राहुल हौसलमल) कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांसह त्यांचे पोलीस पथक उप विभागात अवैध मद्य विरोधी कारवाई साठी काल दि. 11.10.2022 रोजी पहाटे पासून गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सावरगाव (पु.) येथे, कळंब येथील जुनी दुध डेअरी परिसरात व डिकसळ शिवारात गावठी दारु निर्मीती होत आहे.

यावर पथकाने (पहीला छापा) सावरगाव (पु.) येथे 08.45 वा. सु. छापा टाकला असता तेथे भागुबाई उमराव पवार, रा. बायपास रोड, सावरगाव (पु.) या गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 100 लि. द्रव पदार्थ व 25 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 6,250 ₹ किंमतीचा माल बाळगलेल्या आढळल्या. (दुसरा छापा )09.10 वा. सु. वायपास रोडजवळच असलेल्या सोमेश्वर ट्रेडींग कंपनीबाजूस टाकला असता तेथे सावरगाव (पु.) ग्रामस्थ- विकास हरी पवार, सायबाबाई बन्सी काळे, गणेश बसलिंगप्पा लोखंडे हे तीघे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 100 लि. द्रव पदार्थ, 50 लि. गावठी दारु व नवसागर असा एकुण 7,900 ₹ चा माल बाळगलेले आढळले. (तीसरा छापा) 09.45 वा. सु. कळंब येथील जुनी दुध डेअरी परिसरात टाकला असता तेथे कळंब येथील- संतोष बब्रुवान काळे, राहुल राजेंद्र पवार, शालुबाई शिवा पवार, भैया बापु पवार व संतोष विठ्ठल पौळ हे सर्व गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 300 लि. द्रव पदार्थ व 05 लि. गावठी दारु व 15 कि.ग्रॅ. नवसागर असा एकुण अंदाजे 21,250 ₹ चा माल बाळगलेले आढळले. तर (चौथा छापा) 10.15 वा. सु. डिकसळ शिवारात टाकला असता तेथे डिकसळ ग्रामस्थ- सुरेखा बबलु काळे या गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 200 लि. द्रव पदार्थ व 55 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 12,750 ₹ चा माल बाळगलेल्या असताना आढळल्या. यावर पथकाने चारही छाप्यातील गावठी दारु निर्मीतीचा एकुण सुमारे 700 लि. द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करुन सुमारे 135 लि. गावठी दारु गावठी दारु हस्तगत करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 374, 375, 376, 377/ 2022 हे 4 गुन्हे नोंदवले आहेत. सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक- श्री. एम. रमेश यांसह पोउपनि- श्री. पुजरवाड, श्री. मालुसरे, पोलीस अंमलदार- अंभोरे, साळुके, कांबळे, खांडेकर यांच्या पथकाने केली आहे.
