Spread the love

लातुर ग्रामीण हद्दीत सापडलेल्या अनोळखी मयताचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात

लातूर ( दिपक पाटील) दि.१०.१०.२०२२ रोजी सायंकाळी पाच च्या आधीच बाभळगांव शिवारातील शेत गट नं १० मधील विनायक देशमुख यांचे शेतातील कॅनॉलचे पाण्यात यातील अज्ञात इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन कशाने तरी मारुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे हात, पाय व दोन्ही गुडघे पांढ-या कपडयाने बांधुन व कमरेला एक लाल रंगाचे पिशवीत दगड टाकुन कमरेला बांधुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे मिळुन असल्याने पोहेकॉ यु.एम.देवके यांनी अज्ञात आरोपी विरुध्द फिर्याद दाखल करून गुरनं २०८ / २०२२ कलम३०२, २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश कदम हे करीत असताना सदर गुन्हयाचे तपासात मयताचे खिशामध्ये सापडलेले मोबाईल वरुन मयत हा अरविंद नरसिंगराव पिटले वय ४८ वर्षे रा. बालाजी वाडी पोस्ट वलांडी ता. देवणी जि. लातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयाचे तपासात मयताचा खुन करणा-या अज्ञात आरोपीचे शोध बाबत लातूरचे पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक लातूर श्री अनुराग जैन, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल गोसावी साहेब लातूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश कदम व स्थागुशा पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे तपास पथके तयार करुन तपास कामी रवाना केले.तपास करत असताना पोलीसांना यातील मयताची पत्नी सुनिता अरविंद पिटले व सुभाष साहेबराव शिंदे यांचे अनैतिक संबंध असुन त्यांनीच मयताचा खुन केल्याचे खबऱ्यामार्फत गोपनिय माहीती मिळाली. लातूर ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथके तयार करुन तात्काळ दोन्ही आरोपीचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सखोल चौकशी केली असता मयतास आरोपींचे अनैतिक संबंधाबाबत माहिती पडल्याने व तो दारु पिवुन सतत त्याची पत्नी सोबत भांडत असल्याने पत्नी सुनिता हिने सुभाष शिंदे याच्या मदतीने मयत अरविंद यास जिवे ठार मारुन त्याचे प्रेत बाभळगाव शिवारातील कॅनलमध्ये दोन्ही हात, पाय, गुडघे बांधुन, पिशवीत दगडे टाकुन पाण्यात टाकल्याचे कबुल केल्यानंतर पोलीसांनी दोन्ही आरोपीतांना दिंनाक १२/१०/२०२२ रोजी अटक केले. सदरची कामगिरी ही वरिष्ठाच्या मार्गदर्शनात स्थागुशा चे सपोनि शैलेश जाधव ,रवी गोंदकर, खुर्रम काजी, राम गवारे ,जमीर शेख, सचीन मुंडे , नकुल पाटील व लातूर ग्रामीण चे सपोनि तानाजी पाटील पोलिस अंमलदार – उत्तम देवके,सचिन चंद्रपाटले,राहुल दरोडे,अनिल जगदाळे,यादव , आळणे यांनी केली असून, पूढील तपास पोलिस निरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!