Spread the love

पोलीसांवर दगडफेक करणारे दरोडेखोर अटकेत, 2 गुन्ह्यांची उकल.

येरमाळा – ( राहुल हौसलमल) येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि- दिनकर गोरे व पोलीस अंमलदार चालक- चिखलीकर यांचे पथक दि. 14.09.2022 रोजी रात्री 03.55 वा. सुमारास चोराखळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर चोराखळी फाटा परिसरात शासकीय वाहनाने राञगस्त करत होते. यावेळी विरूद्ध दिशेने लाल रंगाची कार क्र. एम.एच. 14 सीसी 2578 ही जात असल्याचे दिसल्याने पथकाने पाठलाग करुन ती कार थांबवली. त्या कार चालकास पोलीसांनी विचारपुस केली असता तो उडवा- उडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्या कारची पोलीसांनी झडती घेतली असता आतमध्ये चाकु, स्क्रु, कत्ती असे दरोड्याच्या तयारीचे साहित्य आढळले. यावर पथकाने त्याला पोलीस ठाण्यास नेण्यासाठी आपल्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने विशिष्ट प्रकारची आरोळी देताच रस्त्याच्या बाजूच्या अंधारातील त्याचे अन्य साथीदार दरोडेखोरांनी पोलीस पथकावर दगडफेक करत त्यास घेऊन गेले होते. या प्रकरणी पोलीसांनी भा.दं.सं. कलम- 399, 402, 353, 336 नोंदवला आहे. त्याच दिवशी साधारणपणे पाच च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील उपळाई फाटा येथील एका हॉटेलसमोर विश्रांतीस उभ्या असलेल्या ट्रकच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून नळीद्वारे आतील डिझेल प्लास्टीक कॅनमध्ये भरुन चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे हॉटेल चालक- विनोद हारभरे यांना आढळले होते. अशी तक्रार हारभरे यांनी दिल्यानंतर येरमाळा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 248/2022 हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हाचा तपास करीत असताना पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येरमाळा पोलीस ठाण्याच्या  पथकाने आज दि. 14.10.2022 रोजी पारधी पिढी, कन्हेरवाडी येथील- राजेंद्र कालीदास काळे व पारधी वस्ती, बावी येथील- दादा लाला काळे व बावी शिवारातून एका विधीसंघर्षग्रस्त बालक या तीघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात  वापरलेली दोन  चारचाकी वाहने त्यांच्याकडून जप्त केली. पोलीसांनी आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून तपास केला असता नमूद दोन्ही गुन्ह्यांसह येरमाळा घाटातील धावत्या ट्रक मधुन साखर चोरी प्रकरणी येरमाळा ठाण्यात  भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 26/2022 हा दाखल असून सदर चोरीही त्यांनीच केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे येरमाळा पोलीसांनी दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यासह अन्य दोन गुन्ह्याची उकल केली.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोलीस अंमलदार- मुकूंद गिरी, किरण शिंदे, धनंजय सांडसे, मोहम्मद सय्यद, गणेश गुळमे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!