
उस्मानाबाद धाराशिव:- जिल्हा प्रतिनिधी (श्रीकांत मटकिवाले) जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ गलांडे यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती करण्यात आल्याबाबत बिड जिल्हा काॅग्रेस कमेटीचे सरचिटणीस मालोजी गलांडे व केजचे माजी नायाब तहसिलदार दादासाहेब बोराडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार,शाल,टोपी आणि मिठाई देऊन सत्कार केला ,

आणि सदर कार्यकाळास अभिनंदन करुन शुभेच्छाही देण्यात आल्या.जनसामान्य रुग्णांची तपासणी मनोभावे करीत कर्तव्य बजाविणारे डॉ राजाभाऊ गलांडे यांना उस्मानाबाद जिल्हाच नव्हे तर इतर जिल्ह्यांतील नागरिक देखिल कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणुन ओळखु लागले.तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक पदावरुन पाय उतार झाल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात नाराजीचे सुरू उमटत होते,परंतु श्री गलांडे यांनी नेमणुक दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजाविले.परत एकदा त्यांची जिल्हा शल्यचिकित्सक पदी निवड झाल्याने आनंद व्यक्त होत आहे असे मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.सोबतच कोरोना कार्यकाळात चांगली रुग्ण उपचार करणारे डॉ.इकबाल मुल्ला यांचेही गुणगौरव करण्यात आले.यात प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे सहित वैद्यकीय अधिकारी डॉ इकबाल मुल्ला,बिड जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस मालोजी गलांडे,केजचे माजी नायाब तहसिलदार दादासाहेब बोराडे,सामाजिक कार्यकर्ते तथा मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे, शामराव कुलकर्णी,श्री मुंढे,श्री पवार,श्री पाटिल अन्य इतर उपस्थित होते.

