
उस्मानाबाद / धाराशिव :- (जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले) जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.राजाभाऊ गलांडे यांचा सत्कार व शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला.डाॅ.राजाभाऊ गलांडे यांची निवड योग्य असुन जिल्हा शल्यचिकित्सक पदावरुन बाजुला केल्यानंतर रुग्णालयात अगदी वेळेवर येत मनोभावे आलेल्या रुग्णांवरती औषधोपचार चांगल्या प्रकारे करीत.परत एकदा कर्तव्य दक्ष डॉ. राजाभाऊ गलांडे यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती देऊन शासनाने न्याय केला आहे.असे मनोगत मान्यवराकडुन करण्यात आले.यात प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश वाघमारे, संग्राम बनसोडे, प्रविण जगताप, स्वराज जानराव,आप्पा सिरसाठे,अमोल मुंढे सहित अन्य इतर उपस्थित होते.
