प्रमोद वाघमारे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

उस्मानाबाद – (प्रतिनिधी ) पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी आज दि. 24 / 08 / 2021 रोजी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ) हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या राखीव पोलीस बलापैकी एक कार्यक्षम बल म्हणून नामांकित आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या सुधारणे बाबत महाराष्ट्र शासन नेहमीच पुढाकार घेत असते. इतर राज्यातील राखीव पोलीस बलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरील अधिकारी हे ब्राऊन कलरचा बेल्ट व ब्राऊन कलरचा शूज परिधान करतात
तसेच वनविभागातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दलातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांना सुद्धा ब्राऊन बेल्ट व ब्राऊन शूज आहे. महाराष्ट्रात एकूण 16 राज्य राखीव पोलीस बलाचे ग्रूप आहेत. त्यामध्ये एकंदरीत 350 ते 400 पोलीस उपनिरीक्षक आहेत, परंतु त्यांना काळा बेल्ट व काळा शूज असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यातील फरक ओळखणे मुश्कील झाले आहे
तरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1999 भाग 1 आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल नियम 1959 मध्ये आवश्यक तो बदल करून या पोलीस उपनिरीक्षकांना ब्राऊन बेल्ट व ब्राऊन शूज परिधान करण्याची मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी परवानगी द्यावी. असे म्हटले आहे, यावेळी निवेदन देताना प्रवीण जाधव , शुभम कदम , अभिजित देडे , यांची उपस्थिती होती.
