
न्याय हक्कासाठी संघर्षच करावा लागतो..परंतु तो रास्त असेल तरच..
उस्मानाबाद धाराशिव ( प्रतिनीधी ) – समस्या येतात आणि जातात परत त्या पेक्षाही कमी जास्त समस्या समोर येतात आणि त्याला आपापल्या परीने सावरण्यासाठी जे ते प्रयत्न करतात.आज शेतकरी पिक विमासाठी आमदार मा.कैलासदादा पाटिल साहेबांचे उपोषण चालु आहे तर याच पिक विमासाठी आमदार मा.राणा दादा पाटील साहेब यांनीही यशस्वी प्रयत्न केले आहेत.शेतकरी सहित सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करणे हे आपण निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे व त्यांनी ते पार पाडणे गरजेचे आहे.आज जिल्ह्यातील परिस्थितीला अनुसरुन प्रशासनाने जिल्ह्यात दि.२९ आक्टोबर २०२२ ते दि.१३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु केला आहे तो जनहितार्थ असुन आपण सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे,आमदार मा.कैलास दादा पाटील साहेब यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणुन शेतकरी असतील या पक्ष कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती चढुन,पाण्यात,जमीनीत स्वताला पुरुन,विविध मार्गाचा अवलंब करीत आहेत तर उद्रेक म्हणुन काही ठिकाणी बसेस वरती दगड फेक करीत

आहेत,मा.आमदार साहेब हे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करुन शासनाकडे न्याय मागत आहेत,भावना पोटी आपण विपरीत काही करु नये,आपल्या समोर कुटुंब आहे याला नजरे आड करु नका..मा.लोकप्रतिधींनी आपापल्या कार्यकर्ते, शेतकरी यांना ही आवाहन करावे की,शांतता सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करु नका.. गरज राहिल वास्तवतेची शेतकरी आणि कामगार एका नाण्याच्या दोन बाजु असुन हे दोन्ही आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत.. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा.. जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा..
असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,उस्मानाबाद यांनी केले आहे.
