जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचे आवाहन
उस्मानाबाद – ( श्रीकांत मटकिवाले) फळबाग लागवड योजनांच्या माहितीसाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड योजनेविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.मनरेगा आपल्या गावी.. मनरेगा आपल्या दारी..याला स्मरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामानानुसार पारंपारिक शेतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये सोयाबीन उडीद मूग दूर हरभरा ज्वारी गहू इत्यादी पिके मुख्यत्वे घेतले जातात तसेच ओलिताखालील भागात ऊस हे पीक घेतले जाते वास्तविक पाहिले तर या पिकांमधून आजही आपला शेतकरी समृद्ध झालेला नाही अनियमित पडणारा पाऊस बदलते वातावरण बाजारपेठेत पिकांना मिळणारा कमी भाव इत्यादी यामुळे शेतकऱ्याला शेतीमध्ये संकटांना सामोरे जावे लागते महाराष्ट्र शासनाने मग्रारोहयो अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर व शेत बांधावर फळबाग लागवड ही योजना आणली असून उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता शेतजमीन फळबाग लागवड करण्यासाठी योग्य आहे फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून शाश्वत उत्पनाची हमी आहे तसेच शासन निर्णय 12 एप्रिल 2018 नुसार कृषी विभाग सोबत ग्रामपंचायत ही फळबाग योजना देणारी यंत्र ठरली आहे शेतकऱ्याला फळबाग योजना तयार करत असताना जमीन तयार करण्यापासून ते फळबाग संशोधन करण्यापुढे तीन वर्षासाठी शंभर टक्के अनुदान मिळते यात लाभार्थी निवडी निवडताना मनरेगा अंतर्गत फळबाग करत असताना खाली प्रवगातून लाभार्थींची निवड करण्यात येते.
१) अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती.
२) भटक्या जमाती.
३) निरधीसृचित जमाती. (विमुक्त जाती)
४)दारिद्र्य रेषेखालील जमाती.
५) स्त्री कर्ता असलेले कुटुंबे.
६) शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे.
७) जमीन सुधारणा लाभार्थी.
८) प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी.
९) उपरोक्त १ ते ८ प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ दिल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना सन २००८ च्या मध्ये व्याख्या केलेल्या अल्पभूधारक (१ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) व सीमांत भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) यांच्या जमिनीवरील कामांना शर्तीच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात यावे.मग्रारोहयो साठी जॉब कार्ड धारक वरील प्रवर्गातील कोणत्याही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये फळबाग लागवडीचे फायदे त्याला मिळणारे आर्थिक अनुदान याबद्दल चर्चा करण्यात आली शेतकरी घेत असेल पारंपारिक पिकांचे उत्पन्न हेक्टर साठी पिकाचे नाव,पिकांचा कालावधी, हेक्टरी उत्पादन,एकूण रक्कम रुपये,हेक्टरी खर्च रुपये,खर्च वजा नफा हेक्टरी तसेच फळबाग लागवडीचे फायदे व आर्थिक मिळणारे अनुदान मनरेगा मधून फळबाग लागवड करताना आर्थिक अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे प्रती हेक्टर साठी फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एका हेक्टर वरील लाभ दिसतो फळबाग जोपासणी करत असताना अंतर पिके घेता येतात त्यामुळे फळबागेसोबत इतर पिकांच्या उत्पन्नाची हमी मिळते.मनरेगा योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना घेण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक असुन ही योजना संबंधित तालुका कृषी कार्यालय,ग्रामपंचायत कार्यालय येथे याबाबत माहिती उपलब्ध आहे.यासाठी कागदपत्रे म्हणुन ग्रामसभेचा ठराव,विहित नमुन्यातील अर्ज,हमी पत्र,७/१२,८अ चा उतारा आवश्यक आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे.
