Spread the love

.उस्मानाबाद धाराशिव :- (श्रीकांत मटकीवाले ) दि बुध्दिष्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातुन भारत व नेपाळ मधील बौध्द धम्म पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.बौद्ध धम्म स्थळे पाहण्याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटक आज रोजी रवाना झाले,महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला,स्वागता पुर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत बुद्ध वंदना घेण्यात आली. आलेल्या मान्यवरांनी सहलीतील पर्यटकांना शुभेच्छा दिल्या.भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने पर्यटकांना चहा व नाश्ताची सोय करण्यात आली होती. त्यातच सोलापूर ते नागपुर पर्यंत संविधान जनजागरण साठी निघालेली संविधान यात्रेचेही आगमन झाले असता संविधान रॅलीतील कार्यकर्त्यांचाही भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.संविधाना विषयी लोकांनी जागृत होणे खुप गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त करण्यात आले,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र धुरगुडे व खिल्लारे हे पर्यटकांना शुभेच्छा देण्यासाठी खास वेळ काढुन आले होते,तसेच डॉ.बशारत अहमद,अब्दुल लतीफ,दादासाहेब जेठीथोर,अजय वाघाळे, हे देखिल संविधान रॅली व पर्यटक स्वागत कार्यक्रमास सहभागी झाले होते.सहलीसाठी एकुण पंच्चावन्न पर्यटक तर सहल मार्गदर्शक गुणवंत सोनवणे,सुकेशन ढेपे,दिलीपराव निकाळजे,सहित साठ जण या पर्यटनासाठी रवाना झाले.धम्म सहल पर्यटकांच्या स्वागत कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, गुणवंत सोनवणे,विश्वास पांडागळे,अंकुश उबाळे,संपतराव शिंदे,स्वामीराव चंदनशिवे,शीलाताई चंदनशिवे,गणेश वाघमारे,पृथ्वीराज चिलवंत, मृत्युंजय बनसोडे,सुदेश माळाळे,रवि सुरवसे,निखिल बनसोडे,संजय गजधने, विजय बनसोडे,सिद्राम वाघमारे,विद्यानंद बनसोडे,रणजीत गायकवाड,सोमनाथ गायकवाड,पत्रकार श्रीकांत मटकीवाले,अतुल लष्करे,प्रशांत शिंदे,श्रीकांत चिलवंत,स्वराज जानराव,अमोल वाघमारे,विनायक गायकवाड,बाबा कांबळे,सचिन दिलपाक, मधुकर भालेराव,आप्पा सिरसाठे,अन्य इतर व महिला भगिनी,बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुकेशन ढेपे यांनी केले तर आभार बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!