Spread the love

उदगीर ( दिपक पाटील ) : उदगीर चे तहसीलदार हे जनसामान्यात ओळखले जाणारे अधिकारी असले तरी दुय्यम अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची नाचक्की कशी होईल हे काहींनी ठरविले आहे . पुरवठा विभागाने तर या महसूल विभागाचे तीन तेरा केले आहेत, असे म्हटले तर वावगे वाटू नये. शासनाची लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासनाची धडपड असते , पण सर्व नियम धाब्यावर बसवत पुरवठा विभागाने वाटेल तसा व्यवहार केल्याचे आरोप जाहीर पणाने ईतर तालुक्यातील ठिकाणावरून केले जात आहेत.तहसील प्रशासनाला बदनाम करणारे हे त्यांचेच कर्मचारीवर्ग असल्याने महसूल विभागात लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ कामासाठी दुसऱ्या वेळेस लाच स्वीकारून महसूल विभाग हे लाचखोर असल्याचे निष्पन्न केले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे कि प्रशांत अंबादास चव्हाण हे लिपिक नेमणूक उदगीर तहसील कार्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने लावलेल्या सापळ्यामध्ये ते रंगेहात सापडले आहेत.यापूर्वी देखील त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी २०१६ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. तक्रारदार यांच्या भाऊजी वर गुन्हा दाखल झालेला असताना सदर गुन्ह्यांमध्ये जामिनासाठी ऐपतदार प्रमाणपत्र( सालवंशी) प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयातील असलेल्या प्रशांत अंबादास चव्हाण यांनी तक्रारदार यास दोन हजार रुपयाची लाचेची मागणी केली, आणि आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम देण्यासाठी तहसील कार्यालय उदगीर येथील महसूल विभागात बोलावले. आणि पंचा समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण तसेच पोलीस उपाधीक्षक पंडित रेजीतवाड, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर , अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या पथकाने सदरील सापळा यशस्वी केला. त्यामुळे प्रामाणिक असलेल्या तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांचे नाव बदनाम होत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती किंवा दलाल कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची रक्कम मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!