Spread the love

उस्मानाबाद -( श्रीकांत मटकीवाले) जिल्हाधिकारी मा.डॉ.सचिन ओम्बासे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांना कारखानास्थळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टेबिलीटी सुविधेमार्फत कारखानास्थळी रेशन धान्य उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झालेली असून उस्मानाबाद तालुक्यातील केशेगांव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना येथे तहसिलदार श्री. गणेश माळी यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाचे उदघाटन (दि.25) करण्यात आले.ऊसतोडीसाठी गाव सोडून स्थलांतरित झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी रेशन धान्य उपलब्ध होऊ शकत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा.डॉ.ओम्बासे यांच्या संकल्पनेतून कारखाना स्थळी ऊसतोड कामगारांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबीलीटी सुविधेद्वारे धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकरी शेतकरी सहकारी साखर कारखास्थळी धान्य देण्याकरीता रास्तभाव दुकानाची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे दि.25/11/2022 रोजी ऊसतोड कामगारांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे धान्य वितरणाचे उद्घाटन उस्मानाबादचे तहसिलदार श्री.माळी यांच्या हस्ते करण्यात आले.या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक श्री.लिंबराज लोकरे तर संचालक श्री.हनुमंत काळे, कार्यकारी संचालक सूर्यकांत डाके, नायब तहसीलदार (पुरवठा) राजाराम केलुरकर, कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी कमलाकर राजुरे, कार्यालय अधिक्षक अभय तिवारी, महसुल सहायक संतोष सरगुले आदी उपस्थित होते.तहसीलदार श्री.माळी यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्री.केलुरकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.राजुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!