उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉलमध्ये महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच.निपाणीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधीज्ञा वैशाली धावणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश आणि तक्रारदार महिला उपस्थित होत्या.
आजच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
• राज्यातील सर्व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम सुरु केला आहे.
• बालविवाहावर आळा घालण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासन पूर्ण ताकदीने काम करणार. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत माहिती देणाऱ्यास बक्षीस व नावाची गोपनीयता राखली जाईल.
• बालविवाह रोखण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातल्या आशा वर्कर्स यांनी पुढाकार घेऊन याबाबतची माहिती प्रशासनास कळवावी.
• महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र बळकट करण्यात येईल. या ठिकाणी चांगली खोली, सौचालय, फर्निचर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार.
• गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्तेला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. तसेच याबाबत प्रशासनास वेळोवेळी अवगत करावे.
• 112 व 1098 या टोल फ्री क्रमांकावर महिला व विद्यार्थीनींना होणाऱ्या छेडछाडबाबत तक्रार करावी.
• हरवलेल्या महिला व मुलींसाठी पोलिस प्रशासनाकडून मिसींग सेल सुरु करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कौतुक करण्यात आले.
• कौटुंबिक हिंसाचार, हुंडा बळी अशा समस्या समाजापुढे मोठे आवाहन आहे. या गोष्टी घरात होत असल्यामुळे कायदा व प्रशासन यात हस्तक्षेप करण्यापेक्षा समाजाने स्वत: सुसंस्कारी होणे आवश्यक आहे.