Spread the love
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदारांनी घेतली भेट
लातुर-(प्रतिनिधी) — लातुर जिल्ह्यातल्या उदगीर येथे सैनिक भरती परीक्षा केंद्र तर लातुर येथे केंद्रीय सैनिकी स्कुल सुरुवात करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. नुकतीच खासदार सुधाकर शृंगारे यांनी या मागण्यां संदर्भात दिल्ली येथे मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली, या भेटी दरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांबाबत संरक्षण मंत्र्यांनी अश्वस्त केले आहे.–लातुर जिल्ह्यातल्या उदगीर येथे सैनिक भरती परीक्षा केंद्र उभारावे, त्यासाठी लागणारी जागा प्रशासनाकडे उपलब्ध आहे, उदगीरलगत कर्नाटक आणि आंध्र सीमावर्ती भाग असल्याने त्या भागातील युवकांनाही उदगीर येथे भरती परीक्षा केंद्र सुरुवात झाल्यास फायदा होणार आहे. त्यामुळे या मागणीचा प्राधान्याने विचार करावा. त्याच बरोबर लातुर ,येथील शैक्षणिक अनुकूल वातावरण पाहता सैनिकी स्कुलला मान्यता द्यावी. सैनिक भरतीच्या फेऱ्याही लातुरला आयोजित करण्यात याव्यात अश्या अनेक मागण्या खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे निवेदना द्वारे केल्या आहेत. लातुर जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटर आणि बीएसएफ ट्रेनिंग सेंटर असल्याने येथे सैनिक भरतीसाठीचे अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उदगीर येथे भरती परीक्षा केंद्र आणि लातुर येथे सैनिकी स्कुल उभारावे अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे.–या मागण्यांबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खासदार सुधाकर शृंगारे यांना अशवस्त केले आहे. लातुरला शैक्षणिक महत्व असल्याने सैनिकी स्कुल सुरू केल्यास त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.खासदारांच्या मागण्यां पूर्ण झाल्यास जिल्ह्यात सैनिकी सेवेसाठीचे वातावरण याअधिक तयार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!