
लातूर (प्रतिनिधी ) बाभळगाव ता.जि. लातूर येथील बाभळगाव शेतात जाणारया नाल्यात (ओढ्यात) एक मनोरुग्ण माणूस तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी बसलेला आहे व रात्री ओढ्यात (नाल्यात) झोपत आहे अशी माहिती सेवानिवृत्त साह्यक फौजदार श्री भानुदास सोळुंके यांनी पोलीस पाटील श्री मुक्ताराम तुकाराम पिटले यांना दिली . पोलीस पाटील यांनी गावातील श्री शिवराज गोमारे, मनोजकुमार सोळुंके, भानुदास साळुंके व पोलीस पाटील मुक्तराम पिटले हे तेथे जाऊन पाहिले तर तो मनोरुग्ण माणूस निघून गेला होता पण त्या झोपलेल्या ठिकाणी एक निळ्या रंगाचा बटवा विसरून गेला होता. तो बटवा जवळ जाऊन उघडून पाहिले असता आत मध्ये 500 रूपयांच्या 17 नोटा व 200 रूपयांच्या 2 नोटा असे एकूण रोख रक्कम रुपये 8900 (आठ हजार नऊशे रुपये) व एक नाकातील सोन्याचे दागिने अंदाजे 2500 रूपयांचे व घरातील पत्नी, व मुलींच्या पासपोर्ट साईजच्या 5 फोटो व एक मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मिळून आली. त्या नंबरवर पोलीस पाटील मुक्ताराम पिटले व भानुदास सोळुंके यांनी मनोरुग्णांच्या नातेवाईकांचा संपर्क साधला असता तो मनोरुग्ण आंध्र प्रदेशातील कडपाल जिल्हा मेडक येथील आहे असे समजले व नातेवाईक ऊस तोडणी कामगार असून ते ऊस तोडण्यासाठी कर्नाटकात गेले आहेत असे समजले व त्या व्यक्तीकडून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नंबर मिळाला मनोरुग्ण व्यक्तीच्या मुलीशी संपर्क झाला व मुलगी व ईतर नातेवाईक त्या व्यक्तीला घेण्यासाठी बाभळगाव ता.जि.लातूर आले व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब यांनी त्या मनोरुग्णांस त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करून मनोरुग्णाच्या नातेवाईकांना 8900 रूपये व नाकातील सोन्याचा दागिना देण्यात आले.
यावेळी बाभळगावचे पोलीस पाटील मुक्ताराम पिटले, सेवानिवृत्त साह्यक फौजदार भानुदास सोळुंके ,बिट जमादार जगदाळे, घंटे,टारपे, राहूल दरोडे यांच्या सह अनेक पोलीस उपस्थित होते.
या वेळी सेवानिवृत्त पोलीस व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे मनोरुग्णास त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करून रोख रक्कम व सोन्याचा दागिना मिळाल्या बद्दल त्या व्यक्तीच्या मुलीने समाधान व्यक्त केले. माणूसकी अजून जिवंत आहे यांचे ताजे उदाहरण आहे
