Spread the love

 

   

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक  सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

लातूर ( प्रतिनिधी ) :    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा सहसमन्वयक  सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याने दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख साठ  हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून  देण्यात आली आहे.  या मदत निधीच्या मंजुरीचे पत्र  दोन्ही  रुग्णांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. 

  आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या बबन कांबळे यांच्यावरील योग्य त्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख रामहरी राऊत , सह कक्ष प्रमुख माऊली धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बबन कांबळे यांना  साथ हजार रुपयांच्या मंजुरीचे पत्र   नुकतेच जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बालाजी काकडे यांच्या हस्ते  रुग्णाच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. त्याचप्रमाणे अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी येथील हृदयरोगाने  ग्रस्त असलेले रुग्ण  उमाकांत माळवदे यांच्यावर पुण्याच्या एका खाजगी इस्पितळात उपचार चालू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे पात्र संपर्कप्रमुख बालाजी काकडे यांच्या हस्ते रुग्णाच्या नातेवाईकांना लातूरच्या शासकीय विश्रामगृहात सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख एड.  बळवंतभाऊ जाधव, उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, शहर प्रमुख दिनेश बोरा,  परवेज पठाण,  मुंदडाताई, श्रीनिवास लांडगे, प्रशांत स्वामी, बंडू भाऊ कोद्रे, विजय जाधव, 

 संदीपमामा जाधव, बावगेताई  यांसह  रुग्णाचे  नातेवाईक उपस्थित होते .  ग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने कार्यरत असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व मंगेश चिवटे हे  कायम गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतात. रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे तसेच सोमनाथ जाधव यांचे आभार मानले. त्यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत हजारो रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!