Spread the love

लातूर ( प्रतिनिधी)दिनांक 22/04/2023 रोजी रमजान ईद साजरी होणार असल्याने दयांनद गेट, बार्शी रोड, लातुर ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधव मोठया संख्येने नमाज पठणासाठी येतात. त्यामुळे नमाजाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होऊन रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद होत असतो, तथापि नागरीकांच्या दैनंदीन कामकाजानिमीत्त व दळणवळणानिमीत्त त्यांना विविध ठिकाणी पोहचणे निकडीचे असते सदरच्या अडचणी लक्षात घेता दि. 22/04/2023 रोजी सदर भागातुन वाहतुक बंद करणे व वाहतुक वळविणे अपरिहार्य आहे.

दिनांक 22/04/2023 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असणारे मार्ग

1.        ईदगाह मैदान, दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अॅप्पे अॅटो शोरुम बार्शी रोड तसेच त्यालगतचा स्व.विलासराव देशमुख मार्ग (रेल्वेलाईनचा पॅरलल रोड) हा सर्व वाहनांना (एस.टी.बसेस, ट्रक, टेम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स व मिनिडोर, कार, मोटरसायकल इत्यादी) वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.

दिनांक 22/04/2023 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

1.        शिवाजी चौकातुन पीव्हिआर चौकाकडे जाणारी एस.टी.बसेस, इतर मोठी वाहने हे तहसील कार्यालय समोरुन ओव्हर ब्रिजवरुन औसा रोडने राजीव गांधी चौक – छत्रपती चौक टी पॉर्इंट मार्गे जातील व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पी.व्ही.आर.चौकाकडे जाणारे मोटर सायकल, तीनचाकी व चारचाकी वाहने छ.शिवाजी महाराज चौक ते औसा रोडने अशियाना टी  पॉर्इंट, खाडगाव रोड मार्गे पी.व्ही.आर.चौककडे जातील किंवा छ.शिवाजी महाराज चौक ते अंबाजोगाई रोडने जटाळ हॉस्पीटल – शाम नगर इंडीया नगर मार्गे पी.व्ही.आर. चौकाकडे जातील.

2.        बार्शी रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणारी जड वाहने व एस.टी. बसेस हे पी.व्ही.आर. चौकातून वळून औसा टी पार्इंट – राजीव गांधी चौक मार्गे शहरात प्रवेश करतील. तसेच मोटर सायकल, तीनचाकी व छोटी चारचाकी वाहने पी.व्ही.आर.चौकातून वळून खाडगाव टी पॉर्इंट-आशियाना बंगला मार्गे औसा रोडकडे येतील किंवा पीव्हिआर चौक-एमआयडीसी-एक नंबर चौकातुन इंडीया नगर रोडने जुना रेणापुर नाका मार्गे शहरात प्रवेश करतील,तरी सर्व नागरीकांनी दिनांक 22/04/2023 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असलेल्‍या  मार्गावर वाहनांचा वापर टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!