आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी
अहमदपूर ( प्रतिनिधी) दिनांक 14/04/23 सकाळी 07.00 वाजण्याची सुमारास पोलीस ठाणे किनगाव मोहगाव रोड, येथे शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा प्रेत डोक्याला जखम व बाजूला रक्ताने माखलेला दगड आढळून आला होता. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी खून केला वगैरे तक्रारीवरून भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघड केस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन किनगाव स्वतः करीत होते.तपासा दरम्यान सदर गुन्हयातील मयत अनोळखी व्यक्तीची ओळख निष्पन्न करून गोपनीय बातमीदारच्या आधारे मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून सदरचा गुन्हा आरोपी तेजस शिरसाट, राहणार शिरसाटवाडी यांने केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी तेजस शिरसाठ याचा पोलीस दिनांक 14/04 /2023 पासून शोध घेत होते, परंतु तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके तयार करून शोध घेण्यात येत होता. तो कोणत्याही नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसाठी जिकीरीचे व आव्हानात्मक काम होते.
सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला श्री. निकेतन कदम, सहाय्यक पोलीस अधीक्षक,उपविभाग चाकूर चार्ज अहमदपूर व श्री.अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः भेट देऊन तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी श्री. सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते सदर पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने पुणे येथे जाऊन आरोपी विषयी सर्व प्रकारची गोपनीय माहिती जमा केली होती . त्या माहितीच्या आधारे दिनांक 22/04/2023 रोजी पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी तेजस शिरसाट याला चाकण परिसर पुणे येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. आरोपीने दारू पिताना झालेल्या किरकोळ शिवीगाळी वरून खून केल्याचे कबूल करून गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या कबुलीप्रमाणे पुरावे हस्तगत करण्याचे काम चालू आहे. आरोपीला मा. न्यायालय समोर हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे.सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्यासाठी श्री भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकातील पोउपनि संदीप अन्यबोईनवाड, सहा. पोउपनि श्री. गोखरे, पोलीस अमलदार शिवाजी तोपरपे, नागनाथ कातळे, सुनील श्रीरामे इत्यादींनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा अतिशय कमी वेळात छडा लावून गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
