
कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक (iNCOVAC) लसीचा समावेश करण्यात आलेला आहे.
लातूर (प्रतिनिधी)राज्यस्तरावरून इन्कोव्हॅक लसीचा पूरवठा करण्यात आला असून सदरील लस ही ६० वर्षावरील नागरिकांसाठीच्या प्रिकॉशन डोससाठीच वापरण्यात येणार आहे. इन्कोव्हॅक ही लस नाकाद्वारे थेंब (Nasal drops) टाकून देण्यात येणार असून प्रत्येक नाकपूडीत ४ थेंब याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिस ८ थेंब देण्यात येणार आहे. सदरील लसीसाठी इंजेक्शन घेण्याची गरज नाही.
सदरील लस विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मनपाच्या लसीकरण केंद्र येथे उपलब्ध ठेवण्यात येत आहे. यापूर्वी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीनयापैकी कोणत्याही लसीचे दोन डोस घेतलेले असतील तरी त्यांना इन्कोव्हॅक ही लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येणार आहे.
तरी ६० वर्षावरील ज्या नागरिकांनी त्यांचे दोन्ही डोस घेवून ६ महिन्याचा कालवधी पूर्ण होवूनही अद्याप प्रिकॉशन डोस घेतलेला नाही अश्या ६० वर्षावरील नागरिकांनी त्यांचा प्रिकॉशन डोस त्वरीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मनपाच्या लसीकरण केंद्रावर जावून घ्यावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
