Spread the love
तीन गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची 
कारवाई.


लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रेनापुर तालुक्यातील वसंतनगर तांडा,महापूर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे  इसमावर  दिनांक 01/05/2023 रोजी सकाळी छापामारी केली. यामध्ये 3,040 लिटर रसायन ,साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 1 लाख 84 हजार रुपयेचे रसायन,हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कार्यवाहीत 

1) सुखदेव खंडू राठोड राहणार वसंत नगर तांडा महापूर तालुका जिल्हा लातूर

2) गणेश राम राठोड राहणार वसंत नगर तांडा महापूर तालुका जिल्हा लातूर.

3) व एक महिला
अशा एकूण 03 आरोपीवर पो.ठाणे रेनापुर येथे कलम 65(ड)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथक मधील सहाय्यक फौजदार अंगद कोतवाड, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हसबे, तुराब पठाण, जमीर शेख , राजू मस्के , नकुल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!