Spread the love



जामनेर (भिकाजी गुरव ) दि.28/09/2022 रोजी कुंभारी खुर्द येथील अंगणवाडी केंद्रात पोषण महा अभियाना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा व पारंपारिक खेळ व पारंपारीक भाज्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन कुंभारी खुर्द चे सरपंच सौ.भारती श्रीराम राठोड व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती भिसे मँडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दलित मित्र श्री मोरसिंगभाऊ राठोड होते तर कार्यक्रमाला माजी सरपंच श्री विष्णु राठोड, उपसरपंच नितेश जाधव, भुरलाल जाधव,रमेश जाधव जाधव, आजमल जाधव, मुख्याध्यापक प्रशांत वाघ सर तसेच गावातील नागरिक, महिला व किशोरी मुली उपस्थित होत्या.


या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे बनवलेले सकस आहाराचे प्रदर्शन तसेच पारंपारिक खेळणी, पारंपारिक भाज्या, मातीच्या बनवलेल्या वस्तू, बौध्दिक विकासाच्या विविध वस्तुंचे प्रदर्शन मांडले होते. प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती भिसे मँडम यांनी या सर्व प्रदर्शनाची सविस्तर माहिती उपस्थितीतांना दिले. स्वस्थ बालक स्पर्धेमध्ये विजयी बालकांना प्रमाणपत्र व पारंपरिक खेळणी देऊन गौरव करण्यात आला. रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या किशोरी मुलींना मेहंदी कोन बक्षिस देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कुंभारी खुर्द येथील अंगणवाडी सेविका श्रीमती मिरा नाईक, रेखा ब्राम्हंदे, मदतनीस नेतल जाधव, तुळशीबाई चव्हाण यांनी केले होते. वाकडी बिटातील सर्व सेविका मदतनीस यांनी सुद्धा मेहनत घेतली. सुत्रसंचलन श्री भागवत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मिरा नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!