
एकट्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत 9 ठिकाणी चालतो अनधिकृत वेश्या व्यवसाय.
लातूर ( दीपक पाटील) बारा नंबर पाटी मांजरा गेट परिसरातील राहत्या घरी महिलांना वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली, तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आंटीला अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून मांजरा गेटवर राहत्या घरी हा गोरखधंदा सुरू होता. स्थानिक व्यावसायिक, नागरिकांमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. मात्र, स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनंतर अनैतिक मानवी देह व्यापार पोलिसांनी डमी ग्राहकाला 1500 रुपये देऊन सापळा रचला. रविवारी सायंकाळी डमी ग्राहकाने आत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आत प्रवेश केला. तेव्हा दोन खोल्यांमध्ये महिला दिसून आल्या. 1000 ते 3000 रुपयांमध्ये त्यांच्याकडून देहविक्री करवून घेतली जात होती. सदरील आंटी वर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु. र. न.705/2025 कलम 143, सहकलम 3,4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत ऑंटी भाग्यश्री ( भागी) सर्जेराव आपेट वय 30 वर्ष राहणार मांजरा गेट जवळ तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पोलीस निरीक्षक अशोक अनत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला पोलीस सुदामती यादव , लता गिरी, चालक निहाल मणियार यांनी केली.

