Spread the love

लातूर (प्रतिनिधी) : श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७३ वा यात्रा महोत्सव सुरु आहे.या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत असून या अंतर्गत रविवार दि. १ मार्च रोजी कुस्त्यांची दंगल पार पडणार आहे. यात्रा महोत्सवातील या कुस्त्यांच्या दंगलीसाठी लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक पैलवान आपली उपस्थिती लावत सिध्देश्वर केसरीचा मान मिळविण्यासाठी नशिब आजमावत असतात. या कुस्तींच्या दंगलीसाठी मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिक व कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे व अशोक भोसले यांनी केले आहे.

लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव पार पडत आहे. हा महोत्सव अंतिम टप्प्यात आला असून रविवार दि. १ मार्च रोजी या महोत्सवांतर्गत कुस्त्यांची दंगल पार पडणार आहे. सिध्देश्वर यात्रेतील कुस्त्यांसाठी लातूर जिल्ह्यासह पर जिल्हा व परराज्यातील अनेक मल्ल आपले नशिब आजमावण्यासाठी कुस्तीच्या फडात उतरत असतात. या कुस्तीमधील विजेत्याला मिळणाºया सिध्देश्वर केसरीच्या मानाच्या पुरस्कारासाठी अनेकजण वर्षभर मेहनत घेत असतात. त्यामुळे या कुस्त्यांची दंगल नागरिकांसह कुस्तीप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरत असते.या कुस्ती स्पर्धेत अंतिम विजेता ठरणाºया मल्लास सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने चांदीची गदा देण्यात येते. याबरोबरच या कुस्ती स्पर्धेत सहभाग घेणाºयांना विविध पारितोषकांची उधळण केली जाते. या स्पर्धेत अंतिम कुस्तीत पराभूत होणाऱ्या मल्लास लातूर महानगरपालिकेच्या वतीने लातूर केसरीचा मान देवून ५१ तोळे चांदीचे कडे देण्यात येते. त्याचबरोबर विविध मान्यवर व कुस्तीप्रेमी कडून देण्यात येणाऱ्या स्व. सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ रायगड ग्रुपच्या वतीने अमर कोकाटे यांच्याकडून रत्नेश्वर केसरीचा मान देवून ५१ तोळ्याचे चांदीचे कडे देण्यात येते.
यासोबतच स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ ओम गोपे व जयप्रकाश गोपे यांच्या वतीने ५१ तोळे चांदीचे कडे तर स्व. किशनराव तुळजाराम हलवाई यांच्या स्मरणार्थ केतन हलवाई यांच्या परिवाराच्या वतीने २१ तोळे चांदीचे कडे वेगवेगळ्या विजेत्यांना देण्यात येते. यासोबतच अनेक मान्यवरांच्या वतीने वेगवेगळी पारितोषिके कुस्ती स्पर्धेत सहभागी होवून विजयी होणाºया मल्लांना देण्यात येतात. या स्पर्धा रविवार दि. १ मार्च रोजी श्री सिध्देश्वर देवस्थानच्या प्रांगणात सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरु होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी लातूर शहरासहजिल्ह्यातील मल्लांनी सहभागी नोंदवावा तसेच सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानचे प्रशासक सचिन जाबुंतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे व अशोक भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!