चारचाकी गाड्याना थांबवून प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन आरोपीतांकडून 6 लाख 76 हजार रुपयांचे 9.4 तोळे सोन्याचे दागिनेसह अटक.

लातूर (प्रतिनिधी) काही दिवसा पूर्वी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीमध्ये लातूर ते रेणापूर रोड जाणारे रोड वरील बोरवटी गावा जवळ अज्ञात आरोपींनी कार मधून जाणारे दांपत्याना अडवून त्यांना धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेहल्याचे दोन घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे रेणापूर येथे कलम 309(4), 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता व 392, 32 भादवी प्रमाणे 2 गुन्हे दाखल झाले होते.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना गुप्त खबऱ्याकडून मोटरसायकल वर येऊन कार चालकांना अडवून त्यांना धमकी, धाक दाखवून, जबरीने सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली. त्यामुळे सदर पथकाने आरोपींना दिनांक 17/01/2025 रोजी त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन नमूद आरोपीला गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे 9.4 तोळे वजनाचे 06 लाख 76 हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
1) अमोल सुभाष राठोड, वय 27 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर.
2) अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण, वय 21 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर.
3) कृष्णा राजूभाऊ ढमाले, वय 25 वर्ष, राहणार बोरवटी तालुका जिल्हा लातूर.
यांना ताब्यात घेवुन
मुद्देमाल जप्त करून नमूद गुन्ह्यात अटक करणे कामी पोलीस ठाणे रेणापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईत पोलीस ठाणे रेणापूर लातूर येथील 2 जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे रेणापूर चे पोलीस अधिकारी करीत आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.