शिवाजीनगर पोलीसांकडून दोन कॅफे चालकांना अटक.
लातूर (प्रतिनिधी ) शिवाजी नगर, ठाण्यात गुरनं. ४६८/२०२५ क. १३७ (२) बीएनएस प्रमाणे दि.०४/१२/२०२५ रोजी एका अल्पवयीन पिडीत मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात मसपोनि/सुप्रीया केंद्रे यांनी तात्काळ पिडीत मुलीचा शोध घेवून दि.०४/१२/२०२५ रोजी तिच्या कडे विचारपुस केली असता तिने जवाब दिला की, आरोपी नामे रिहान गुलाब शेख, वय १८ वर्षे, रा.सेलु, ता. औसा, जि.लातूर याने जबरदस्तीने पळवून नेवून तिचेवर कॅफे डेली ग्रीन्ड, खर्डेकर स्टॉप, ओसा रोड लातूर व एस.पी. कॅफे डेअर, खाडगाव टी पॉइंट जवळ, रिंग रोड लातूर येथे घेवून जावुन जबरी संभोग केल्याचे सांगीतले. त्यावरून सदर गुन्हयात कलम ६४,६५,६९,३५१(२) बीएनएस सह कलम ४, ६, ८, १२ पोस्को सह कलम 3(1) (W)()(), 3(2)(Va) अ.जा.ज.अ.प्र.का १९८९ प्रमाणे कलमवाढ झाल्याने गुन्हयाचा तपास श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचेकडे वर्ग झाला.
तपास अधिकारी श्री. समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांनी तपासा दरम्यान अल्पवयीन पिडीतेवर जबरी संभोग करणारा आरोपी रिहान गुलाब शेख, वय १८ वर्ष, रा.सेलु, ता. औसा, जि.लातूर यास दि.०४/१२/२०२५ रोजी अटक करून दि.०५/१२/२०२५ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस ०३ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला. त्यानंतर गुन्हयात पिडीतीवेर जबरी संभोग करण्यासाठी जागा उपलब्ध करून गुन्हा करण्यास अप प्रेरणा देणारे कॉफीशॉप चालक आरोपी नामे १) सुरज राजेश ढगे, वय २९ वर्ष, व्यवसाय एस.पी. कॅफे डेअर, खाडगाव टी पॉइंट जवळ, रिंग रोड लातूर, रा.द्वारकापुरी अपार्टमेंट, खाडगाव रोड, लातूर २) अनिकेत अजय कोटुळे, वय २७ वर्षे, व्यवसाय कैफे डेली ग्रीन्ड, खर्डेकर स्टॉप, औसा रोड लातूर रा.साई रोड, लातूर हे निष्पन्न झाल्याने गुन्हयात कलम १७ पोक्सो हे वाढवून त्यांना दि.०५/१२/२०२५ रोजी अटक करून तिन्ही आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांचा दि.०८/१२/२०२५ रोजीपावेतो पोलीस कोठडी मंजूर केला आहे. सदर गुन्हयात मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनच्या सहाय्याने तांत्रीक पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, लातूर व श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर, श्रीमती सुप्रिया केंद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, पोस्टे शिवाजी नगर, व पोलीस अंमलदार महेश पारडे, गणेश मोरे, मिलींद कांबळे, पांडुरंग सगरे, राहुल क्षिरसागर, फॉरन्सीक टिमचे अर्जुन मुळे, श्रुती पंचगल्ले यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन
अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना गुन्हा करण्यासाठी मदत करणारे मित्र,नातेवाईक तसेच लॉज, कॅफे , हॉटेल, कॉफी शॉप मालक व चालक यांच्यावर देखील पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना देखील गुन्ह्यात सह आरोपी करून अटक करण्यात येत आहे.
तरी सर्व लॉज,हॉटेल,कॅफे,कॉफी शॉप चालक व मालक यांना आवाहन करण्यात येते की आपण जर आरोपींना गुन्हा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केल्यास तसेच आपणास गुन्ह्या संदर्भाने माहिती असून देखील त्याबाबत माहिती लपविल्यास आपणा विरुद्ध देखील पॉक्सो व तत्सम कायदा अंतर्गत कारवाई करून सदर गुन्ह्यात सह आरोपी करून अटक करण्यात येईल.
