
किनगाव (प्रतिनिधी) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असद रफियौद्दीन तांबोळी व इस्माईल रफियौद्दीन तांबोळी हे दोघे स्वतःच्या फायद्यासाठी अन्न पदार्थ गुटखा हे मानवी जीवितास धोकादायक असल्याचे माहीत असताना देखील त्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःची पांढऱ्या रंगाची इंडिगो कार क्र. MH 25R.9555 मध्ये नऊ पोते गोल्ड 540 पॉकेट प्रत्येकी पॉकेट अंदाजे किंमत 150 प्रमाणे 81000 राजनिवास एका पोत्यात 37 पॉकेट प्रत्येकी पॉकेट अंदाजे किंमत 600 रुपये प्रमाणे 22200रुपये बाळगून वाहतूक करत असताना हायगाई व निष्काळजीपणे जोराच्या वेगाने कार चालवत असताना सताळा गावच्या पुढे पुलाजवळ कार पलटी झाली.त्यामधे आरोपी इस्माईल रफियौद्दीन तांबोळी वय 39 वर्षे रा.दर्गापुर गल्ली अहमदपूर यांचा मृत्यू झाला. अपघात झालेल्या कारची अंदाजे किंमत 250000 रुपये असा एकूण 353200 रुपये माल जप्त करण्यात आला. अपघात क्र 14/2021मध्ये तपासात निष्पन्न झाल्याने आज रोजी फिर्याद वरून गुरन 236/2021 क 279,338,304 अ,188,272,273 भादवी गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि.शैलेश बंकवाड हे करीत आहेत.
