
रेणापूर :-{ दिपक पाटील } लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कंबर कसली आहे ,बऱ्याच प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करत कोट्यावधी रूपयांचा मुद्देमाल जप्त करत कित्येक अवैध धंदेवाल्यावर कारवाईचा बडगा उगरला आहे , वरिष्ठांचे आदेश पालन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस हे पण कामाला लागले आहेत पण अवैध धंदेवाला पण आपल्या फायद्यासाठी पोलीसांची नजर चुकवून धंदा करतच आहे , त्यातच एक खबर्याकडून स्थागुशा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल बहुरे यांना एक बातमी समजली की रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे तिरट जुगार खेळला जात आहे ,त्यांनी तात्काळ ही गोष्ट वरीष्ठ यांच्या कानावर घातली त्यांनीही चर्चा करून कारवाई करण्याचे आदेश दिले . पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल बहुरे यांना मिळालेल्या माहितीनुसार खरोळा , ता- रेणापूर येथे खरोळा ग्रामीण रुग्णालय च्या पाठीमागील जवळगा पानंद रस्त्यावर संजय शिंदे यांच्या शेतातील घरासमोर लिंबाच्या झाडाखाली तिरट जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे सायंकाळी साडेपाच च्या सुमारास छापा टाकून तेथे ७ ते ८ लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. त्या ठिकाणी गोलाकार बसून पत्ते घेवून तिरट जुगार खेळत असताना पोलिसांना दिसले. त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांनी नावे विचारले असता १} हेमंत संजय शिंदे वय १९ रा.खरोळा २} सय्यद शौकत महबूब वय ४८ रा.सराये मोहल्ला रेणापूर ३} शिवा सुरेश अपसिंगेकर वय ३२ रा.पिंपळ फाटा रेणापूर ४} अभिषेक दामोदर पाटील वय २१ रा. पाटील गल्ली रेणापूर ५} कमलाकर सुभाष एकूरगे वय २७ रा.एकूरगे गल्ली रेणापूर ६} अंगद महादेव जोगदंड वय ३४ रा.कामखेडा ता.रेणापूर ७}अविनाश प्रताप चिताडे वय २६ रा.पानगाव ता.रेणापूर ८} रफीक आयूब मुजावर वय ३० रा.नळेगाव ता.चाकूर असे सांगितले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ८ लाख २२ हजार ६३० रुपयांचा ८ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल तीन मोटार सायकल व एक चार चाकी स्कॉर्पिओ वाहण जप्त करण्यात आले. रेणापूर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच सदरील कार्यवाहीत स्थागुशा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल बहुरे व कर्मचारी भोसले, गवारे, कोळसुरे, सुरवसे, भोंग, गायकवाड, धारेकर व चालक पाटील यांनी बजावली.
