किनगाव :- (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील 25 वर्षीय . विवाहित महिलेच्या हाताला धरून माझ्यासोबत चल म्हणून विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात रविवारी सायंकाळी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कोपरा येथील विवाहित महिला शेतातील काम आटपून शनिवारी सायंकाळी 5.30 वा .घराकडे येत होती. यावेळी याच गावातील जनार्धन शामराव फुले यांनी महिलेचे हाताला धरून तू माझ्यासोबत चल माझ्या मोटार सायकल वर बस म्हणून जबरदस्ती करू लागला . त्यावेळी महिलेने झालेला प्रकार आपल्या पतीस सांगून या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात रविवारी सायंकाळी गुरन 296 / 21 कलम 354 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ डोईजड हे करीत आहेत.
