

किनगाव (प्रतिनिधी) मा.पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व पोस्टे प्रभारी अधिकारी यांनी आदेशीत केले होते .दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी दुपारी 03 वाजता अहमदपूर तालुक्यातील विळेगाव शिवारातील मण्याड नदी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तहसील कार्यालय अहमदपूर व पोलिस स्टेशन किनगाव यांचे यांचे संयुक्त पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता मण्याड नदी पात्रा मध्ये काही वाळू माफिया हे बेकायदेशीर व अवैधरित्या वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने उपसा करत असताना दिसून आले.ते पथक पाहताच सदर ठिकाणावरून पळून गेले. सदर ठिकाणी अवैध व विना परवाना चोरीच्या उद्देशाने वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन टू-10 पोकलेन मशीन व एक वाळू चाळणी असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली आणि एकूण 31 ब्रास वाळू असा एकूण 62,02,518/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे.त्यापैकी दोन पोकलेन मशीन व ट्रॅक्टरची ट्रॉली पोलिस स्टेशन किनगाव येथे जमा करण्यात आले असून सज्ज विळेगावचे तलाठी नीलकंठ कराड यांच्या तक्रारीवरून पोस्टेला गुन्हा क्रमांक गुरन 17/2022 कलम 379, 34भादवी सह कलम 21(1)खान खनिज अधिनियम 1957 सह कलम 15 पर्यावरण अधिनियम 1986 सह कलम 48(7)(8)महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि जाधव हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजीले,तहसीलदार कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शैलेश बंकवाड साहेब,पोउपनी राजेश जाधव साहेब,पोलिस अंमलदार महाके, कातळे,डोईजड, कोतवाड तसेच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मोरे,मंडळ अधिकारी क्षीरसागर तलाठी कराड व पथक यांनी केली आहे.
