लातूर :- { दिपक पाटील } शहरातील गंजगोलाई येथील शिवाजी रोडवर अज्ञात चोरट्याने सिगरेट बॉक्स पळविल्याची तक्रार गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७ ~०२~२०२२ ला तक्रार गु.र.नं ७० कलम ३७९ नुसार दाखल झाली होती , फिर्यादी अरुण हनुमंतराव देगलवाडे वय 28 वर्षे राहणार रेणुका नगर ,सोमनाथपूर, उदगीर यांचे संगमेश्वर किराणा स्टोअर्स नावाचे दुकान असल्याने ते किराणामाल भरण्याकरीता लातूरला आले होते, त्यांनी शिवाजी रोड येथे आपली गाडी क्रमांक एम एच २४ ए यू २४९५ या गाडीत किराणा माल भरला सोबत ब्रिस्टॉल सिगरेट बॉक्स ही गाडीत ठेवण्यात आला होता , त्यावेळी अज्ञात चोरट्याने ते ध्यान ठेवून सिगरेट बॉक्स पळविण्यात आला , त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे पथक ही कामाला लागले त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्याला संशयित आरोपी अजय नितेश उपाडे राहणार जय नगर लातूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ,त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली व पळविलेला ब्रिस्टॉल सिगरेट बॉक्स किंमत ७० हजार ३९८ हा मुद्देमाल पथकास परत दिला , त्या मुळे वरिष्ठांनी पथकाचे कौतूक केले. सदरील पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहिद शेख ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे, पोना महेश पारडे ,पो.ना अभिमन्यू सोनटक्के यांनी ही कामगिरी केली व पुढील तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत.