Spread the love


उस्मानाबाद -( प्रतिनिधी) खिरणीमळा, उस्मानाबाद येथे गोवंशीय प्राण्यांची मांसासाठी अनाधिकृतरित्या कत्तल होत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास दि. 05.02.2022 रोजी राञी 10.00 वाजण्याच्या सुमारास मिळाली. यावर स्था.गु.शा. च्या पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- काझी, घुगे, चव्हाण, आरब, कवडे, पोना- सावंत, जाधवर, पोकॉ- कोळी, आरसेवाड, ठाकुर, मरलापल्ले यांच्यासह पोलीस मुख्यालयातील दंगा काबु पथक अशा पथकाने राञी 10.30 वाजता खिरणीमळा येथे छापा टाकला असता तेथील पत्रा शेडमध्ये हुसेन पापा शेख, फैसल कैसर पठाण, सागर कबीर गायकवाड, आनंद जीवन पेठे हे चौघे 12- 14 गुरांची कत्तल करुन मांस, डोके, पाय असे अवयव व मांस कापत असल्याचे आढळले. यावेळी नमूद चौघांसह बाजूच्या अंधारातून कत्तलखाना चालक-मालक खलीफा कुरेशी व कलीम कुरेशी यांसह अन्य 5-6 अनोळखी पुरुषांनी पोलीसांसह स्थानिक नागरीक- पवन कोमटी, सुमीत नवले, धन्यकुमार पटवा, सतीष सिरसीला यांच्यावर दगडफेक केली. या सोबतच नमूद चौघांनी कत्तलखान्यातील चाकुने पोलीस व नागरीकांवर हल्ला केला. या हल्ल्यात धन्यकुमार पटवा यांच्या उजव्या पायाला, दोन्ही हातांना व डोक्याला तर संतोष सिरसीला यांच्या डोक्यास जखम झाली. तसेच पोलीस पथकातील समाधान नवले यांच्या उजव्या डोळ्यास, बबन जाधवर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत तर पथकातील अनेकांना किरकोळ जखमा झाल्या. यावेळी पोलीसांनी नमूद चौघांना तेथे आढळलेल्या सुमारे 2,820 किलोग्रॅम वजनाच्या गोवंशीय मांसासह कत्तल साहित्यासह ताब्यात घेतले. या प्रकरणी सपोनि- शैलेश पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून नमूद सहा लोकांसह अन्य 5-6 अनोळखी पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 333, 326, 325, 324, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5(कत्र, 9 (अ) अंतर्गत उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!