Spread the love

उस्मानाबाद जिल्हा : ( प्रतिनिधी) जुगार प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 24.02.2022 रोजी 7 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन  16 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 7 गुन्हे नोंदवले आहेत.

1) उमरगा पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता यात कुन्हाळी, ता. उमरगा येथील बाबु कुकर्डे,  चेंडकाळ, ता. उमरगा येथील शाम माने व कदमापुर येथील अशोक ममाळे हे तीघे कुन्हाळी गावातील चौकात तीन ठिकाणी ऑनलाईन फन टारगेट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 32,090 ₹ रक्कम बाळगलेले पथकास आढळले.

2) भुम पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता यात लक्ष्मीनगर, भुम येथील अक्षय चव्हाण हे वालवड येथील बाजार मैदानात कल्याण मटका जगार चालवण्याच्या साहित्यासह 1,060 ₹ रक्कम बाळगलेले, तर शाळुगल्ली, भुम येथील गणेश मुसळे हे पाथ्रूड शिवारातील एका शेडसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,260 ₹ रक्कम बाळगलेले असताना पथकास आढळले.

3) सास्तुर, ता. लोहारा येथील जहीर कादरी हे गावातील क्रांती चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,600 ₹ रक्कम बाळगले असताना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) सावरगाव (पु.), ता. कळंब येथील रामेश्वर मुंढे यांच्या बांधकामावरील खोलीत रामेश्वर यांसह गावकरी- बाळासाहेब कसबे, हरीभाऊ शिंदे, रमेश घाडगे, रामानंद चौरे, मनोहर अवधूत, विजय साखरे, चंदर मुंढे, ईरफान मोमीन, कृष्णा पायगिरे हे सर्व कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,20,840 ₹ रक्कम बाळगलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकास आढळले.#DspNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!