Spread the love

वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ;

लातूर ( प्रतिनिधी ) चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लातूर जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलीसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बाबळगाव रोड वरील म्हाडा कॉलनी कमान येथे गुरुवार (दि.२४) रोजी करण्यात आली.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली टाटा पीकअप व एक दुचाकी असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रकाश गिरी वय ३३ वर्षे, रा. हासेगाववाडी ता. औसा ह.मु.ड्रायव्हर कॉलनी,जुना औसा रोड, लातूर असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.म्हाडा कॉलनी कमानीजवळ एक रेकॉर्डवरील गुन्हेगार पांढऱ्या रंगाच्या पीकअप गाडीमध्ये दुचाकी विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्तबातमीदारामार्फत समजली. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे म्हाडा कॉलनी कमान जवळ दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार प्रकाश गिरी यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता नमुद आरोपीने त्याचे कब्जात मिळालेल्या पिकअप वाहन एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ९३/२०२२ कलम ३७९ भारतीय दंड विधान अन्वये गुन्ह्यात व त्या पीकअप मध्ये मागील बाजूस असलेली होंडा कंपनीची दुचाकी शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरनं १०७/२०२२ कलम ३७९ भारतीय दंड विधान अन्वये गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.यासोबतच तीन महिन्यापूर्वी एक चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो चोरी केला होता तो टेम्पो एका मंदिरासमोर थांबवून विक्री करण्यासाठी ग्राहक शोधायला गेला असता गांधी चौक पोलीसांनी तो टेम्पो हस्तगत केला असल्याचे सांगितले या गुन्ह्यातही गांधी चौक पोलीस ठाणे गुरनं ६०६/२०२१ कलम ३७९ भारतीय दंड अन्वये गुन्ह्यात ही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

सदरची कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड,बालाजी जाधव,खुर्रम काझी,माधव बिलापट्टे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, मोहन सुरवसे, नितीन कठारे, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने बजावली आहे. #DspNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!