उस्मानाबाद : ( प्रतिनिधी ) जुगार प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 26.02.2022 रोजी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात 1) आनाळा, ता. उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- कमलेश घोडसे, बाळु हरनावळ, सुभाष तांबीले, नवनाथ शिंदे, हरी चव्हाण, सहदेव नन्नवरे, कैलास रंदिल हे सर्व गावातील ग्रामपंचायत गाळ्याच्या बाजूस तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 2,710 ₹ रक्कम बाळगले असतांना अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले. 2) येरमाळा, ता. कळंब येथील सुबोध ओहोळ हे गावातील महावितरण कार्यालयासमोरील एका शेडजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 4,070 ₹ रक्कम बाळगलेले असताना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले. 3) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास लहुजी चौक, उस्मानाबाद येथे मस्तान पठाण, सागर गायकवाड, जगदीश जाधव, तजमुल तांबोळी, इरफान शेख, सर्व रा. उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 42,500 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुक्रमे अंबी, येरमाळा व उस्मानाबाद (श.) या पोलीस ठाण्यात स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. #DspNews
