लातूर : { दिपक पाटील } स्वराज नगर वसवाडी परिसरातील एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्यावरून त्यांनी ही माहीती घेवुन आपल्या सहकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधीकारी यांचे पथकातील पोलीसांसह टाकलेल्या धाडीत तीन पीडित महिलेची सुटका करून चालक असलेल्या दोन आंटी व तीचा मुलगा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या {१} अश्विनी राम पांचाळ वय ३० रा. स्वराज नगर वसवाडी,{ २} मीना चंद्रकांत पांचाळ वय ४० रा.स्वराज नगर , वसवाडी {३} सागर चंद्रकांत पांचाळ वय २० रा .स्वराज नगर वसवाडी व वेश्यागमनासाठी आलेले [१] विशाल अशोकराव पेठकर वय २० [२] अमित श्रीधर भोजणे वय २२ [३] रोहीत राजीव सुर्यवंशी तिघेही रा. कवळी हिप्परगा ता.औसा जिल्हा लातूर यांच्याकडून पिठा कायद्याखाली अटक केली आहे. त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ कलम ३,४,५ ,७, आणि भादवि ३७०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर ,पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले ,पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे,पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख , वंगे, उपविभागीय पथकातील रामचंद्र
ढगे, महेश पारडे , तसेच सदानंद योगी,गिरी, नलवाड, कांबळे यांनी सहभाग घेतला.
