महिला पोलिसांच्या फटक्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
लातूर :- ( प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मागील काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत होता ..त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत …14 तारखेला एका अल्पवयिन मुलीस त्याने मारहाण केली होती ..त्या भागात दशहत निर्माण करण्याचा प्रयास केला ..मात्र त्या मुलीने विवेकानंद पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली …विवेकानंद पोलिस ठाण्याचे कर्मचारी आरोपीच्या शोधात होते …तो ज्ञानेश्वर नगर भागात आल्याची माहिती मिळताच पोलिसाचे पथक तेथे दाखल झाले …त्यास ताब्यात घेण्यात आले ..तेथून पोलिसांच्या गाडीत न नेता त्यास रस्त्यावरुन चालवत पोलिस ठाण्यात नेन्यात आले ..विवेकानंद पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी या कारवाई पुढाकार घेतला होता …गौस यास पोलिसी ख़ाक्या दाखवतच तो रस्त्यावरंच गयावया करु लागला …तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था पोलिसांनी केल्यामुळे सर्व सामान्य लोक सुखावले होते …पोलिसांनी रसत्यावरुन त्याची काढलेली वरात पाहिली अनेकांनी मात्र मोबाइल शूट केली …त्या भागातील नागरिकांनी झालेला प्रकार वर समाधान व्यक्त केले आहे ….पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले आहे की अशा प्रकारे कोणीही कृत्य करत असेल तर पोलिसांना तात्काळ कळवा , दोषी वर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
