
पोलीस ठाणे विवेकानंद चौकच्या पोलिसांची कामगिरी.

लातूर : ( प्रतिनिधी) दिनांक 19/03/2022 रोजी दुपारच्या वेळेस उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला एक फिरस्त व्यापारी, रस्त्याने कपडे विकणारा नामे हैदरअली मोहम्मद हसनेन यास अज्ञात तीन आरोपीतानी “फाटका बुर्का विकत का दिलास” असे कारण काढून त्यास गाडीवर जबरदस्तीने बसवून घेऊन निर्मनुष्य ठिकाणी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याचे खिशात असलेले रोख रक्कम 3500 रुपये, एक मोबाईलची, फिर्यादीचे हातात असलेले पाच तोळ्याचे चांदीचे कडे, तो विकत असलेले बारा ड्रेस असे एकूण 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस मारहाण करून जबरीने चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती . त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2022 कलम 394 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. त्यावर अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात तात्काळ पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व हद्दीतील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात आली. सदर पथकाने चोवीस तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपींना नामे
1) हजर एकबाल सय्यद, वय 20 वर्ष, धंदा मजुरी, राहणार सिद्धेश्वर नगर, लातूर
2) गौस शादुल्ला शेख, वय 19 वर्ष, राहणार इस्लामपुरा, लातूर
3)कादर जिलानी शेख, वय 20 वर्ष, धंदा मजुरी, राहणार माधवनगर,लातूर
यांना त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश गळगट्टे,
पोलीस अंमलदार मुनवरखा पठाण, संजय कांबळे, विनोद चलवाड, बळीराम आडे, रामराव जाधव यांनी केली. #DspNews
