लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करीता निर्देशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर
येथे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलीस स्टेशन विवेकानंद चौक,लातूर येथे दिनांक 15/04/2022 रोजी फिर्यादी नामे पीरबेग आब्दुला बेग न्यु डायमंड ट्रान्सपोर्ट कंपणी मॅनेजर रा.आर.एम.एल. नगर जिल्हा शिमोगा (राज्य कनार्टक) यांनी दिनांक 05/04/2022 रोजी न्यु डायमंड ट्रान्सपोर्ट कंपणी शिमोगा येथून त्यांचे ओळखीचे ट्रक क्र एम.एच-26-बीई-3965
चा चालक नामे व्यंकटी बालाजी गायकवाड रा.बारड ता.मुदखेड जि.नांदेड यांनी स्वतःच्या ट्रकमध्ये वरील कंपणीतील 350 सुपारीचे पोते किं.अं. 35 लाख 52 हजार 500 रुपये ही सुपारी शर्मा इंन्टर एंटर प्राइजेस दिल्ली येथे विश्वासाने पोहचविण्यासाठी दिली असता त्यांने सदरचा माल सदरच्या
ठिकाणी न पोहचविता परस्पर कोठेतरी विल्हेवाट लावून स्वतःची ट्रक चोरी गेले अशी तक्रार घेऊन पोलीस स्टेशन विवेकानंद चौक,लातूर येथे आला होता. सदर व्यक्तीवर आम्हाला संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांने सदरचा माल व ट्रक स्वतः परस्पर विल्हेवाट
लावल्याचे कबूल केले आहे.नमुद सुपारी ट्रान्सपोर्ट करणारे यांनी पो.स्टे.ला येऊन माझी 350 पोते सुपारी कि.अं. 35 लाख 52 हजार 500 रुपये चे माल चोरी गेले बाबत तक्रार दिल्याने त्यांचे अर्जावरून पो.स्टे.विवेकानंद चौक,लातूर येथे गुरनं 218/2022 कलम 406 भादंवि प्रमाणे गुन्हा दिनांक 15/04/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यातील गेला माल व अज्ञात आरोपीचा पोलीस पथक शोध घेत असताना,गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यात चोरी गेलेला माल यातील क्र एम.एच-
26-बीई-3965 ही औरंगाबाद येथे मिळुन आली तेथे आरोपी नामे अनिरुध्द ऊर्फ बाळु भारत मिसाळ
रा.औरंगाबाद हा मिळुन आला त्यास आम्ही विश्वासात घेऊन सदर गेला माला बाबत चौकशी केली, असता सदरचा माल हा पुर्णा ता.भिवंडी जि.ठाणे येथे विकण्यासाठी घेऊन गेला आहे. तो मी कुठे आहे ते दाखवितो असे म्हणाल्याने त्यास सोबत घेऊन आम्ही सदर मालाचा शोध घेतला असता
सदरचा माल पुर्णा येथील गोडाऊनमध्ये असल्याचे माहिती दिल्याने सदरचा माल 350 पोते सुपारी जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला माल 350 पोते सुपारी ही विक्री करण्यासाठी घेऊन जाणारे
आरोपी क्र.1) व्यंकटी बालाजी गायकवाड रा.बारड ता.मुदखेड जि.नांदेड 2) अनिरुध्द ऊर्फ बाळु
भारत मिसाळ रा.औरंगाबाद 3) फारुख अहेमद खॉन रा.गोरेवाड रोड,नागपूर 4) हुसेन नासर शेख रा.मालटेकडी रोड,नागपूर यांना आज दि.18/04/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री
अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात असलेल्या पथकातील पोलीस अधिकारी पोउपनि,महेश गळगटे, पोउपनि जिलानी मानुल्ला, पोउपनि बालाजी गोणारकर सफौ बुड्डेपाटील, सफौ रामचंद्र
ढगे, महेश पारडे ,मुन्ना पठाण, संजय कांबळे, विलास फुलारी, रामलिंग शिंदे, दयानंद सारुळे, विनोद चलवाड, खंडु
कलकत्ते,रमेश नामदास, अशोक नलवाड,नारायण शिंदे तसेच सायबर सेल चे संतोष देवडे,रियाज
सौदागर व गणेश साठे यांनी केली आहे.
